लोणावळा – नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या कार्ला येथील श्री एकविरा विद्या मंदिर शाळा व श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनियर काॕलेज मधील विद्यार्थांंना वह्यांचे वाटप करण्यात आले. उद्योजक कै मदनलाल गुप्ता यांंच्या स्मरणार्थ शाळेतील ४५० विद्यार्थी व विद्यार्थींनींना गुप्ता परिवराच्या वतिने वह्या देण्यात आल्या.
यावेळी एकविरा विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष सोनबा गोपाळे, सरपंच दिपाली हुलावळे, उपसरपंच किरण हुलावळे, सदस्या भारती मोरे, माजी मुख्याध्यापक भगवानराव शिंदे, प्राचार्य कैलास पारधी, धनंजय गट्टे, संतोष हुलावळे, विकास दगडे, अरुणा बुळे, उमेश इंगुळकर, विवेक भगत, सचिन हुलावळे, बाबाजी हुलावळे, रोहिदास वाघवले यांंच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.




