वडगांव मावळ :- कोथुर्णे विकास सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत मावळ तालुक्याचे माजी सभापती व भाजपचे जेष्ठ नेते ज्ञानेश्वर दळवी यांच्या विरोधात त्यांचा पुतण्या संतोष दळवी यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पुरस्कृत भैरवनाथ परिवर्तन पॅनलने बारा पैकी आठ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापीत केले. तर ज्ञानेश्वर दळवी यांना चार जागांवर समाधान मानावे लागले होते.
1980 सालापासून त्यांची कोथुर्णे विकास सोसायटीवर एकहाती सत्ता होती. संतोष दळवी यांनी त्यांच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावत त्यांच्या निवडून आलेल्या चार संचालकांपैकी दोन सचलकां विरोधात अपात्रतेची कारवाई करण्याकरिता संतोष दळवी यांनी अर्ज केला होता. त्यानुसार ज्ञानेश्वर रामचंद्र निंबळे यांना सन २००१ नंतर ३ आपत्ये असल्याने व शीतल शिवाजी ढोले यांच्या नावावर सहकार कायाद्यानुसार १० गुंठे किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्र नसल्याने या दोन्ही संचालकांना सहाय्यक निबंधक सहकारी संस्था वडगाव मावळ यांनी अपात्र ठरविले आहे. त्यामुळे संतोष दळवी यांनी कोथुर्णे विकास सोसायटीत ज्ञानेश्वर दळवी यांना आणखी एक धक्का दिल्याची चर्चा मावळ तालुक्यात सुरू आहे.




