पिंपरी: प्रभाग क्र.२८ रहाटणी -पिंपळे सौदागर प्रभागात सन २०२२-२३ च्या अंदाजपत्रकातील विविध कामाच्या निविदा काढणेसाठी मा. विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांची आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
सन २०२१-२२ च्या सुधारित व सन २०२२-२३ च्या मूळ अंदाजपत्रकातील प्र.क्र.२८ रहाटणी पिंपळे सौदागर येथील आवश्यक असलेली विकासकामे व देखभाल दुरुस्तीची कामे , तरतुदी अभावी निविदा प्रसिद्धी करू शकत नाहीत.त्यामुळे नागरिकांना गैरसोयीस सामोरे जावे लागत आहे.तसेच प्रभागातील विकास होणेसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
काय केले आहेत मागण्या…..
1) रहाटणी येथील एसएनबीपी शाळेसमोरील डीपी रस्ता, शिवार चौक ते गोविंद गार्डन पर्यंत अद्यावत पद्धतीने काँक्रीटीकरण करणे
2) मुलांना वाहतूक नियमांच्या माहितीसाठी चिल्ड्रेन्स ट्राफिक पार्क तयार करणे
3) आरक्षण क्र.३६७ अ व ३६२ खेळाच्या मैदानाचे स्थापत्य विषयक कामे करणे.
4) मनपा शाळा व स्मशान भूमी येथील सिमाभिंत बांधून स्थापत्य विषयक कामे करणे
5) भिसे पार्क ,शिवराज नगर काटेवस्ती व विविध कॉलनी मध्ये व रस्त्यावर पेव्हिंग ब्लॉक बसविणे
6 ) मनपा शाळा सीमाभिंतीलगत शिवसृष्टी उभारणे व सुशोभीकरण करणे
7) विविध भागातील खडी मुरुमाचे रस्ते व एम पी एम पद्धतीने तसेच हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करणे,खड्डे , ट्रेंचेस , क्रॉसकट बुजविणे , थर्माप्लास्ट पट्टे मारणे ,बेंचेस पुरवणे,नाम फलक बसविणे, झाडे लावून चौक सुशोभित करणे व इतर स्थापत्यविषयक कामे करणे ,आदी कामे करण्यासाठी सन २०२२-२३ च्या अंदाज पत्रकातील कामाच्या तरतुदी करण्यासाठी मा.विरोधी पक्षनेते श्री.विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी निवेदनात मागणी केलेली आहे.




