पवनानगर (वार्ताहर) – कोथुर्णे येथील अल्पवयीन मुलगी अपहरण व हत्या प्रकरणातील नराधामाला शिक्षा मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे. ते शनिवारी रात्री उशिरा कोथुर्णे येथील घडलेल्या पिडींतांच्या कुटुबियांची भेट घेऊन सांत्वन केले.
याबाबत बोलताना पवार म्हणाले की, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्र देऊन सदर खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा व आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हावी याकरिता प्रयत्न करावेत अशी मागणी करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
कोथुर्णे गावातील सात वर्षी मुलीचे अपहरण झाले होते. काल तीचा मृतदेह जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे छिन्ह विच्छिन्न परिस्थितीत मिळून आला होता. याप्रकरणी कामशेत पोलिसांनी आरोपीला २४ तासात अटक केली आहे. मात्र या घटनेची संतप्त प्रतिक्रिया मावळात उमटली असून आरोपीला फाशी द्या, या मागणीसाठी पवनानगर कोथुर्णे व मावळ तालुक्यातील निषेध आंदोलन करण्यात आले. या घटनेमुळे मावळ तालुका हादरला असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या व संतांच्या भुमीत असे कृत्य करणाऱ्या आरोपीला फाशीची झाली पाहीले संताप व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, बाबुराव वायकर, सुधाकर शेळके, दिपक हुलावळे, सचिन घोटकुले शंकरराव शेळके, दत्तात्रय पडवळ, महादु कालेकर, नामदेव ठुले, नरेंद्र ठाकर, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, सुवर्णा राऊत, बाळासाहेब मसुरकर, संजय मोहोळ, ज्ञानेश्वर निंबळे आदींनी आरोपीला लवकरात लवकर शिक्षा करण्याची मागणी केली.




