कामशेत : मावळमधील चिखलसे गावात आजादी का अमृता महोत्सवा अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ या अभियानांतर्गत (दि.१३) रोजी सरपंच सुनिल काजळे यांनी आपल्या गावातील हरी भक्त पारायण सुदाम काजळे यांच्या मातोश्री निमाबाई शिवराम काजळे वय १०२ वर्षे असलेल्या आजी यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
आजीबाई यांनी स्वांतत्रापुर्वीचा काळ आणि स्वातंत्र्यानंतरचा काळ यांनी पाहिलेला आहे. अशा आजीच्या हस्ते ध्वजरोहन करण्यात आले असुन एक ऐतिहासिक दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे.
यावेळी सरपंच सुनील काजळे,उपसरपंच सुविता काजळे,पोलीस पाटील शारदा काजळे, सदस्य सचिन काजळे, संतोष शेंडगे,वैशाली काजळे,रीना बालघरे,कल्याणी काजळे,संजय जाधव,ग्रामसेवक थोरात,माजी उपसरपंच बाळासाहेब काजळे व सर्व जि.प.शिक्षक वर्ग असेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.




