भोसरी : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी दिनाच्या पार्श्वभूमीवर शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण शिरूर मतदारसंघात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भोसरी विधानसभेत 11 ठिकाणी शिबिराचे आयोजन केले आहे. आज भोसरी येथे मा. नगरसेवक संजय वाबळे यांच्या संपर्क कार्यालयाजवळ रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी आमदार विलास लांडे व शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी मा. नगरसेवक संजय वाबळे यांच्यासह परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिक व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




