पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकारी व अभियंता यांच्या अनेक बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करा व दोषींवर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पत्रात म्हटले आहे की, पिंपरी – चिंचवड महापालिकेतील शहर अभियंता मकरंद निकम, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, सह:शहर अभियंता पर्यावरण संजय कुलकर्णी, सह:शहर देवाण्णा गट्टुवार, कार्यकारी अभियंता उद्यान स्थापत्य सुनील वाघुंडे, कार्यकारी अभियंता संजय घुबे, कार्यकारी राजेंद्र राणे, निवृत्त शहर अभियंता राजन पाटील, माजी आरोग्य वैद्यकीय अधिकारी के अनिल रॉय यांच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करा व दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा.
महानगरपालिकेतील वरील उल्लेख केलेले अभियंते व अधिकारी यांचे मोठ मोठ्या उद्योगपती हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते यांच्या बंगल्याला लाजवेल असे बंगले आहेत. काहींच्या बंगल्यांना दोन – दोन लिफ्ट आहेत. काही अभियंत्यांच्या नावे मावळात तसेच मूळ गावी स्वतःच्या तसेच इतर नातेवाईकांच्या व जवळच्या मित्रांच्या नावावर कित्येक एकर जमीन आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील नातेवाईकांच्या ही बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करावी.
यातील काही अभियंते यांनी दरवर्षी आपल्या उत्पन्नाचे व मालमत्तेचे विवरणपत्र महापालिकेला सादर करणे आवश्यक असताना दिलेले नाही. त्यांनी आपली संपत्ती महापालिकेपासून लपवली आहे. त्यामुळे अशा प्रकारे बेहिशोबी मालमत्ता गोळा करणाऱ्या अभियंते व अधिकारी यांची स्थावर व जंगम मालमत्तेची चौकशी करणे व दोषी अधिकाऱ्यांवर




