- चॅलेंजर पब्लिक स्कूल आणि अनिताताई संदीप काटे यांचा पुढाकार..
- स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि बक्षिसांची लयलूट करा – अनिता संदीप काटे
पिंपरी दि. ०२ सप्टेंबर :- कोरोना काळानंतर दोन वर्षांनी गणेश उत्सव संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात निर्बंधमुक्त आणि धुमधडाक्यात साजरा होत आहे. चॅलेंजर पब्लिक स्कूल आणि अनिताताई संदीप काटे यांच्या सौजन्याने पिंपळे सौदागर येथील नागरिकांसाठी ” श्री गणेश उत्सव सजावट स्पर्धे” चे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेच्या निमित्ताने घरगुती गणपती सजावट, सोसायटी गणपती सजावट आणि सार्वजनिक गणपती मंडळांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांना सामाजिक संदेश देणारी सजावट करायची आहे. त्याचप्रमाणे त्या सजावटीचे फोटो मुदतीत आयोजकांच्या ९८८१०४ ०२२९ या व्हाटसअप क्रमांकावर पाठवायचे आहेत.
घरगुती आणि सोसायटी गणपती सजावट स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक पैठणी साडी, द्वितीय पारितोषिक मिक्सर, तृतीय पारितोषिक कुकर राहणार आहे. तसेच स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
उपक्रमाबाबत माहिती देताना अनिताताई काटे म्हणाल्या, पिंपळे सौदागर परिसरात गणपतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणपतीसाठी भक्त सूुंदर अशी आरास तयार करतात. घरोघरी या उत्सवाचा जल्लोष असतो. गणेशभक्तांच्या उत्साहात आणखी भर पडावी, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून कायमच वेगेवेगळे उपक्रम राबविले जातात. या वर्षी गणेश उत्सव सजावट स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत सहभागी विजेत्यांना बक्षिस देखील देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गणपती सजवटीचे फोटो, नाव, संपूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर ९८८१०४०२२९ या व्हाटसअप क्रमांकावर पाठवून स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि बक्षिसांची लयलूट करा, असे आवाहन अनिता काटे यांनी केले आहे.



