पिंपरी :- तडीपार आरोपी परिसरात आल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार फिर्यादी हे त्यांना अटक करण्यास गेले असता आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न करत फिर्यादी यांना धक्काबुक्की केली.
हा प्रकार शनिवारी (दि.३) सांयकाळी साडेसहा वाजता दळवीनगर झोपडपट्टी येथे घडला. अमोल गुलाब माने यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चिंचवड पोलीस ठाण्यात आरोपीवर सरकारी कामात अडथळा आणल्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश ऊर्फ भावड्या भारत कुदळे (वय २७ रा. दळवीनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.




