१९ वर्षीय एका तरूणीने जुळ्या मुलांना जन्म दिला. खास बाब म्हणजे दोन्ही बाळांचे वडील वेगवेगळे आहेत. झालं असं की, तरूणीने दोन्ही पुरूषांसोबत एकाच दिवशी संबंध ठेवले होते. मात्र, अशाप्रकारे दोन वेगवेगळ्या पुरूषांपासून एकत्र प्रेग्नेंट होण्याच्या घटना फार दुर्मीळ असतात
पोर्तुगालच्या गोयस राज्यातील आहे. येथील मिनेरोस शहरातील एका तरूणीने जुळ्या बाळांना जन्म दिला. आईने आपली ओळख सार्वजनिक न करण्याच्या अटीवर सांगितलं की दोन्ही बाळ जेव्हा आठ महिन्यांचे झाले तेव्हा त्यांची DNA टेस्ट केली होती.
मात्र, टेस्टचा रिपोर्ट धक्कादायक होता. ज्या व्यक्तीला दोन्ही बाळांचा वडील मानलं जात होतं. मुळात त्याचं एकच बाळ होतं. दुसऱ्या बाळाचा रिपोर्ट निगेटीव्ह आला.
तरूणीने सांगितलं की, मला आठवलं की मी त्याच दिवशी दुसऱ्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवले होते. या व्यक्तीचा DNA दुसऱ्या बाळासोबत मॅच झाला. हा रिपोर्ट पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला. मला नव्हतं माहीत की, असंही होऊ शकतं आणि कारण दोन्हीही बाळ एकसारखे दिसतात. दरम्यान, बर्थ सर्टिफिकेटमध्ये दोन्ही बाळांचा वडील एकच देण्यात आला आहे. ती म्हणाली की, दोघेही बाळांचा सांभाळ करतात. दोन्ही बाळांच्या संगोपनात ते मदत करतात.




