भारत आणि अमेरिका यांच्यातील आर्थिक युद्ध आता चांगलेच पेटलेले दिसत आहे. कारण कालपासून अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लागू केला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा अमेरिकेकडून भारतावर थेट गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यावेळी अमेरिकी डिप्लोमॅट आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवारो यांनी भारत आणि रशियातील तेलाच्या कराराबद्दल धक्कादायक विधान केले आहे. त्यांनी म्हटले की, “भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने रशियाची आक्रमकता वाढताना दिसत आहे. अमेरिकी टॅक्सपेयर्सचे यामुळे मोठे नुकसान होत आहे.
यासोबतच रशिया आणि युक्रेनच्या संघर्षाला ‘मोदीचे युद्ध’ म्हटले आहे. नवारो यांनी भारताला थेट धमकी देत, “भारताने जर अजूनही रशियाकडून तेल खरेदी करणे बंद केले नाही तर भारताला वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल. त्यांनी पुढे म्हटले, जर भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद केले तर भारतावरील 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ हा रद्द केला जाईल. शांतीचा मार्ग हा भारताहून जातो…” असे त्यांनी म्हटले.
भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतरही अशाप्रकारची विधाने ही अमेरिकेकडून येताना दिसत आहेत. भारतावरील 25 टक्के टॅरिफ काढण्यासाठी अमेरिका तयार आहे, पण त्यांनी मोठी अट भारताकडे ठेवली आहे. भारताने जर रशियाकडून तेल खरेदी बंद केले तर त्यांच्यावरील 25 टक्के टॅरिफ काढला जाईल. पुढे नवारो यांनी म्हटले की, मला एक गोष्ट खूप जास्त त्रासदायक वाटत आहे ती म्हणजे भारतीय इतके घमंडी कसे आहेत? ते म्हणतात की, आमचा टॅरिफ इतका जास्त नाहीये आणि आम्ही कोणाकडूनही तेल खरेदी करू शकतो. नरेंद्र मोदी हे महान नेते आहेत.
भारताने आता अमेरिकेवरील टॅरिफ काढण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, त्यांनी मोठी अट ठेवली आहे. भारताकडून ही अट कधीच मान्य केली जाणार नाही हे सर्वाना माहिती आहे. उलट अमेरिकेने 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर भारताने रशियासोबत काही महत्वाचे करार केले आहेत. भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद केले नाही तर अमेरिका भारतावर अजून कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.