नवी दिल्ली | २१ जुलै २०२५ –
भारताचे उपराष्ट्रपती जयदीप धनगड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुरमु यांच्याकडे अधिकृतपणे राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यांच्या या अनपेक्षित निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
https://x.com/VPIndia/status/1947324464351551541
राजीनाम्याचे नेमके कारण अद्याप अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी राजीनामा दिल्याचे समजते. राष्ट्रपती भवनाकडूनही त्यांचा राजीनामा प्राप्त झाल्याचे आणि त्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
जयदीप धनगड यांनी २०२२ साली भारताचे १४वे उपराष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांनी आपल्या कार्यकाळात विविध घटनात्मक जबाबदाऱ्या, संसदीय प्रक्रियांचे मार्गदर्शन, तसेच राज्यसभेच्या सभापती म्हणूनही सक्रिय सहभाग नोंदवला होता.