पिंपळे गुरव : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा पिंपळे गुरव येथील मुक्तांगण सभागृहात पार पडला. राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राजेंद्र जगताप यांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे अध्यक्ष विजय जगताप, राष्ट्रवादी कॉंगेस पार्टीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील टोणपे, अरुण पवार, अभिषेक जगताप, तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रभाग क्रमांक ४१, ४४, ४५ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा झाला. याप्रसंगी अजित पवार यांनी जगताप यांना शुभेच्छा दिल्या. परिसरातील पन्नास ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांचा पुष्प व कापडी पिशवी देऊन सत्कार झाला.
राजेंद्र जगताप यांच्या वाढदिवस साजरा करताना विजयराज कॉलनी भागात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. वाढदिवसानिमित्त नोकरी महोत्सवात परिसरातील मुला, मुलींनी उस्फूर्त सहभाग नोदवला. ज्ञानेश्वर महाराज जीवन चरित्र कथा अंतर्गत कैवल्याचा पुतळा या विषयावर चरित्र कथा सप्ताह सोमवारी राजेंद्र जगताप यांच्या (दि. १२) सभागृहात सुरू होणार आहे. तो १९ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. कार्यक्रमाचे सूत्र संचालन शैलेश दिवेकर आणि महादेव रोकडे यांनी केले.




