पिंपरी : पवना धरणाच्या पाणलाेट क्षेत्रात पाऊसाच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे पवना धरणाच्या सांडव्याद्वारे आज दुपारी १ पासून ४२०० क्युसेक वाढवुन ६४०० क्युसेस व पावर आऊटलेट १४०० असे एकुण ७८०० क्युसेक करण्यात येणार आहे. त्यामुळे पवना नदी तिराकडील गावातील रहिवाशानी सतर्क रहावे. पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस व धरणे येणारा येवा यांचे प्रमाण बघुन धरणातून सोडलेला विसर्गामध्ये वाढ अथवा कमी करण्यात येईल. असे अशोक शेटे, उपअभियंता यांनी सांगितले आहे.
खडकवासलाच्या सांडव्यावरून मुठा नदीमध्ये सुरू असणारा 15,211 क्युसेक्स विसर्ग वाढवून सकाळी 10.00 वा. 17,671 क्यूसेक्स करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार वरसगाव व खडकवासला धरणाच्या विसर्गामध्ये बदल संभवू शकतो, तसेच नदी किनाऱ्यावरील गावातील गावातील व शहरातील नागरिकांनी सतर्क रहावे. पानशेत धरणामधून नदीपात्रामध्ये सुरू असणारा 2604 क्यूसेक विसर्ग वाढवून सकाळी 8.00 वाजता सांडव्याद्वरे 3908 क्यूसेक व विद्युत निर्मिती केंद्रद्वारे 650 क्युसेक असा एकूण 4558 क्युसेक करण्यात येत आहे. खडकवासला, वरसगाव व पानशेत धरणातून विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो,असे यो.स.भंडलकर यांनी सांगितले आहे.
खडकवासला, वरसगाव व पानशेत धरणातून विसर्गामध्ये वाढ झाल्याने पुणे शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीपात्रातील पाणी पातळी वाढलेली आहे. त्यामुळे पुणे शहरातील मुठा नदीपात्रातील रस्त्यावरती पाणी येऊ शकते.त्यामुळे नदीपात्रातील रस्त्यावरती आपली वाहने पार्क करू नये किंवा पार्क केली असल्यास ती काढून घ्यावीत सुरक्षित ठिकाणी पार्क करावी.
मुळशी धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग 10,560 वरून 13,200 क्युसेक्स करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की, कृपया नदीपात्रात उतरू नये आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. सखल भागातील संबंधीत नागरीकांना सूचना देण्यात याव्यात आणि उचित कार्यवाही करण्यात यावी, असे बसवराज मुन्नोळी, हेड, डॅमस इस्टेट अँड एडवोकसी, टाटा पॉवर यांनी कळवले आहे.
वरसगाव धरणाच्या सांडव्यावरून नदीमध्ये सुरू असणारा विसर्ग वाढवून सकाळी 10 वाजता सांडव्याद्वारे 6994 क्युसेक व विद्युत निर्मिती केंद्रद्वारे 570 क्यूसेक्स असा एकूण 7464 क्युसेक करण्यात आला आहे.



