पुणे : युनियन बैंक ऑफ इंडियातर्फे या क्षेत्रात प्रथमच शेतकरी केंद्रित किसान क्रेडिट कार्डचे डिजिटायझेशन करण्यात आले. ‘संभव’ या डिजिटल परिवर्तन प्रकल्पाचा हा एक भाग आहे.
किसान क्रेडिट कार्ड हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनांतर्गत रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबच्या सहयोगाने केलेला युनियन बँक ऑफ इंडियाचा एक फिनटेक उपक्रम आहे. बँकेला प्रत्यक्ष भेट देणे, जमिनीची मालकी व इतर कागदपत्रे दाखल करणे आणि केसीसी मिळण्यासाठी लागणारा मोठा कालावधी यासारख्या शेतकऱ्यांना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या आव्हानांवर मात करणेही या उपक्रमाची उद्दिष्टे आहेत.
मध्य प्रदेशच्या हर्दा जिल्ह्यात युनियन बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक व सीईओ ए. मणिमेखलाई यांनी प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम लाँच केला. यावेळी रिझर्व्ह बँक इनोवेशन हबचे प्रमुख उत्पादन व्यवस्थापक राकेश रंजन उपस्थित होते.
ए. मणिमेखलाई यांनी यांनी केसीसीचे लाभ आणि मोबाइल हँडसेच्या माध्यमातून ही प्रक्रिया सुरू करण्याविषयी माहिती दिली. यासाठी कोणतीही कागदपत्रे सबमिट करावी लागत नाहीत. जमिनीचे सत्यापन ऑनलाइन केले जाईल. प्रक्रिया पूर्ण होण्याचा कालाधी कमी होईल. कारण, संपूर्ण मंजुरी व वितरण प्रक्रिया काही तासांमध्ये पूर्ण होते.



