राजस्थान काँग्रेसमधील राजकीय गदारोळा दरम्यान आज कॉंग्रेसचे नेते सचिन पायलट आणि कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात दिल्लीत 10 जनपथ येथे बैठक झाली. या भेटीनंतर सचिन पायलट म्हणाले की, मी हायकमांडसमोर आपली बाजू मांडली आहे. तसेच त्यांचे लक्ष राजस्थानवर राहणार असल्याचे सांगितले. मेहनत करून 2023 ची निवडणूक जिंकणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान राजस्थानच्या राजकीय परिस्थितीवर सोनिया गांधी काय निर्णय गेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पायलट आणि सोनिया गांधी यांची 10 जनपथवर बैठक सुमारे तासभर चालली. यानंतर सचिन पायलट बाहेर आले आणि मीडियाशी बोलले. त्यांनी स्पष्टपणे काहीही सांगितले नसले तरी राजस्थानवर लक्ष केंद्रित करण्याचे सांगून मोठे संकेत दिले आहेत. सचिन पायलट म्हणाले की, मी आज काँग्रेस अध्यक्षांची भेट घेतली. त्याने माझे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. जयपूरमध्ये काय घडले यावर आम्ही सविस्तर चर्चा केली. मी माझ्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत, तसेच त्यांना माझा अभिप्रायही दिला आहे.
सोनिया निर्णय घेतील
राजस्थानबाबत संपूर्ण निर्णय सोनिया गांधी घेतील, असे सचिन पायलट म्हणाले.ते म्हणाले की, मला पूर्ण विश्वास आहे की येत्या 12-13 महिन्यांत आमच्या मेहनतीच्या जोरावर आम्ही पुन्हा एकदा राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार बनवू. सचिन पायलट म्हणाले की, सध्या आमचे लक्ष राजस्थानमधील 2023 च्या निवडणुका जिंकण्यावर आहे. त्यासाठी एकत्र येऊन मेहनत करावी लागेल.




