पिंपरी : पिंपरी चिंचवड भाजप पक्षाचे शहराध्यक्ष व भोसरी विधानसभेचे भाजप आमदार महेश लांडगे यांच्या मातोश्री कै. हिराबाई किसनराव लाडगे यांचे निधन झाले आहे. लांडगे कुटुंबीयांच्या सांत्वनपर भेटीसाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. त्यापाठोपाठ विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांनीही भेट घेत लांडगे कुटुंबीयांचे सांत्वन केले.

भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या मातोश्री सौ.हिराबाई किसनराव लांडगे यांचे २४ सप्टेंबर रोजी निधन झाले. यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील व भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलासशेठ लांडे-पाटील , पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अजितभाऊ गव्हाणे आदींनी लांडगे कुटुंबीयांचे भेटून सांत्वन केले.




