पिंपरी (प्रतिनिधी) रस्त्याने चाललेल्या तरुणाला चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आले. ही घटना सोमवारी (दि. ३) रात्री नऊ वाजताच्या सुमारास विनोदे वस्ती येथे पडली.
अभिषेक शशीकुमार चतुर्वेदी (वय २४, रा. ट्रापिक सोसायटी, रावेत) यांनी मंगळवारी (दि. ४) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी विनोदे वस्ती, वाकड येथील सिल्वर स्पून हॉटेल समोरून जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी फिर्यादी यांना चाकूचा धाक दाखवत शिवीगाळ केली. फिर्यादी यांच्याकडील चार हजार रुपयांची मागणी केली.



