पिंपळे सौदागर : पिंपळे सौदागर येथे उत्तर भारतीय क्षत्रिय समाज व नाना काटे सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने छट पूजेचे आयोजन करण्यात आले होते. नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं उत्तर भारतातून पिपंरी चिंचवड शहरात स्थायिक झालेल्या उत्तर भारतीय बांधवांकडून छटपूजा मोठ्या भक्तीभावाने साजरी केली जाते. यावर्षी छटपूजा महादेव मंदिर पिंपळे सौदागर येथे आयोजित करण्यात आली होती.

वेद पुराणा पासून सुरू झालेल्या ह्या पुजेला आजही तेवढ्याच श्रेद्धेने केले जाते. महाराष्ट्रात ज्या प्रमाणे संक्रांतीच्या निमित्ताने सूर्य देवतेची उपासना केली जाते. त्याचप्रकारे उत्तर भारतात प्रामुख्याने उत्तर प्रदेश ,बिहार ,झारखंड तसेच नेपाळ मध्येही छटपूजेच्या निमित्ताने सूर्याची उपासना केली जाते. छटपूजा ही दिवाळीच्या नंतर कार्तिक महिन्याच्या शुक्ल षष्ठी पासून सुरू होते. या पुजेला सूर्य षष्ठी पूजा असेही म्हणतात. वेद पुराणानुसार छटदेवी सूर्य देवाची बहीण आहे. त्यामुळे छटपूजेनिमित्त दोघांची पूजा करण्यात येते. छटपूजेचे व्रत फार कठीण असते. ज्यामध्ये 36तासांचा निर्जला उपवास केला जातो. छटपूजेची सुरुवात सूर्य पुत्र कर्ण याने केली. जन्मत: मिळालेल्या कवच कुंडलाची शक्ती वाढावी म्हणून कर्ण रोज सकाळी पाण्यात उभा राहून सूर्य देवाची उपासना करत असतो. दिवाळीच्या नंतरचा कालखंड थंडीचा असतो त्यामुळे सूर्याच्या उबदार किरणांनी शरीराला हायसे वाटावे. सर्दी ,ताप ह्या सारख्या किरकोळ आजारांपासून सुटका व्हावी. हा शास्त्रीय दृष्टिकोनही मानला जातो. आपल्या संस्कृती मध्येही सूर्य उपासना व सूर्य नमस्कार यांना खूपच महत्व आहे. त्यामुळे छटपुजेला महत्व आहे.
अशा या आपल्या पिपंरी चिंचवड शहरातील उत्तर भारतीय नागरिकासाठी दरवर्षी प्रमाणे पिंपळे सौदागर नाना काटे सोशल फाउंडेशन तर्फे छट पुजा आयोजित केली जाते त्यानुसार या २०२२ वर्षाी देखील पिपंळो सौदागर येथील महादेव मंदीर घाट येथे ही पुजा संपन्न झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता व सौ. गुप्ता मॅडम, उपस्थित होते. त्याचे स्वागत मा. विरोधी पक्षनेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, मा.नगरसेविका सौ. शितल विठ्ठल काटे यांनी केले.
यावेळी मा. महापौर संजोग वाघेरे, नगरसेवक विनोद नढे, शिवशंभो सेवा मंडळ सदस्य ग्रामस्थ तसेच उत्तर भारतीय क्षत्रिय समाज सदस्य ब्रिजेशसिंह, दुर्गेश सिंह, धनंजय सिंह, अमरजीत सिंह, जनार्दन सिंह, विक्रमसिंह, अमित सिंह, विजयप्रकाश सिंह, राकेश गुप्ता, गगन निषाद, विजयबहादूर प्रजापती आदी उत्तर भारतीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




