तळेगाव दाभाडे (वार्ताहर) – तळेगाव दाभाडे येथे १.९९ लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. त्यासोबतच चार चाकी गाडी व इतर साहित्य असा एकूण ५.६१ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संतोष कटके ( वय ४२ रा. तळेगाव दाभाडे) शिवाजी दरेकर ( रा. यशवंतनगर, तळेगाव दाभाडे)व हनुमंत ( रा. खालुंब्रे, तालुका खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कटके व दरेकर या दोन आरोपींना अटक करण्यात आले आहे.
ही कारवाई बुधवारी (दि. २) कासारसाई पुसाणे रोडने पाचाने गावच्या हद्दीत मल्हार पोझिशन सोर्सजवळ ही करण्यात आली. तीनही आरोपींनी संगनमताने शासनाने प्रतिबंधित केलेला १,९९,०६० रुपयांचा तंबाखूजन्य गुटखा विक्री करण्याच्या हेतूने पोत्यामध्ये भरून ३.५० लाख रुपये किमतीच्या पांढऱ्या रंगाच्या टाटा कंपनीच्या चार चाकी गाडीत आणला होता. त्या गाडीत ५०० रुपये किंमतीचा साधा मोबाईल व ८,००० रुपये किंमतीचे साहित्य गाडीत होते. पोलिसांनी असा एकूण ५,६१,४१० रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपी संतोष कटके यांनी घेऊन आला असताना व तो आरोपी शिवाजी दरेकर कडे मिळाला आहे.




