आळंदी (वार्ताहर): आज पंढरीच्या पांडुरंगाची प्रबोधनी कार्तिकी एकादशी निमित्त माऊली मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली होती.
येत्या 20 नोव्हेंबर रविवार रोजी कार्तिकी एकादशी तब्बल तीन वर्षानंतर पूर्ण निर्बंधयुक्त क्षमतेने भरणार असून, यावेळी आठ ते दहा लाख भाविक कार्तिकी वारी साठी अलंकापुरी नगरीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यादृष्टीने देवस्थान आजपासूनच भाविकांच्या सोयी सुविधांसाठी कामाला लागले असल्याची माहिती देवस्थानकडून मिळाली आहे.
आज पहाटे माऊलींना पवमान अभिषेक व इतर धार्मिक कार्यक्रमासह आजची एकादशी भाविकांना संपूर्ण दिवसभर मंदिर खुले करून यावेळी लाखो भाविकांनी माऊलींचे मनोभावे दर्शन घेतले, प्रथा परंपरेप्रमाणे सायंकाळी ठीक साडेपाच वाजता माऊलींची पालखी नगर प्रदक्षिणेसाठी निघाली असता माऊली माऊली चा एकच नामजघोष होत होता हरिनामाच्या गजरात पालखीची नगर प्रदक्षिणा सुरू असताना माऊलींच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी आळंदीकरांसह भाविकांनी देखील एकच गर्दी केली होती.



