पिंपरी :- महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग व ‘ब’ क्षेत्रिय कार्यालय यांनी संयुक्तिक ब क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत भोंडवे कॉर्नर ते मुकाई चौक बी.आर.टी. रोड रावेत येथील अनधिकृत व्यवसायिक पत्राशेडवर (दि. १९) रोजी कारवाई केली. या कारवाईमध्ये ८ पत्राशेड एकूण अंदाजे १४६३.०० चौ.मी. (१५७५०.०० चौ.फुट) अनाधिकृत बांधकामे निष्कासित केली व मुकाई चौक येथील फूटपाथ वरील ८ टपऱ्या जप्त करण्यात आल्या.
ही कारवाई प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त मकरद निकम, शहर अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली सोनम देशमुख क्षेत्रीय अधिकारी ब क्षेत्रीय कार्यालय व सुचिता पानसरे अ क्षेत्रीय कार्यालय व कार्यकारी अभियंता आबासाहेब ढवळे बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग यांच्या नियंत्रणाखाली करण्तया आली.
ही कारवाई महेश बरीदे उप अभियंता ,मनोज वोरसे उप अभियंता, विजय भोजने उप अभियंता, प्रविण धुमाळ, रमेश जिंतीकर कनिष्ठ अभियंता, अ व ब प्रभाग येथील धडक कारवाई पथकातील कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व मनपा कर्मचारी व अतिक्रमण विभाग कर्मचारी तसेच ६ मनपा पोलिस कर्मचारी व रावेत पोलिस स्टेशन ३ पोलीस उपनिरीक्षक, १५ पोलिस कॉन्स्टेबल कर्मचारी, महाराष्ट्र पोलिस सुरक्षाबल ३८ कर्मचारी यांच्या सहाय्याने करण्यात आली. या कारवाई ५ जेसीबी तसेच २६ मजुर सहभागी झाले होते.




