पिंपरी : स्वच्छ सर्वेक्षण २०२३ या स्पर्धेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सहभाग घेतला असून त्यानुसंघाने ऑक्टोबर २०२२ या महिन्यात क्षेत्रीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या महापालिकेच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यामध्ये अ क्षेत्रीय कार्यालयाने प्रथम क्रमांक ,इ क्षेत्रीय कार्यालयाने द्वितीय क्रमांक, ह क्षेत्रीय कार्यालयाने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, उल्हास जगताप तसेच विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
- अ क्षेत्रीय कार्यालयाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक क्षेत्रिय अधिकारी सुचिता पानसरे यांनी स्वीकारले
- इ क्षेत्रीय कार्यालयाचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक सहा.आयुक्त राजेश आगळे यांनी स्वीकारले
- ह क्षेत्रीय कार्यालयाचे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक सहाय्यक आय़ुक्त विजयकुमार थोरात यांनी स्वीकारले




