पिंपरी : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे केंद्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्यामुळे पिंपरी चिंचवड छावा मराठा युवा महासंघ यांनी त्यांच्या निषेधार्थ जोडो मारो आंदोलन केले.

यावेळी छावा मराठा युवा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, प्रकाश जाधव, मराठा सेवा संघ उद्योग आघाडी राष्ट्रीय, अध्यक्ष दादासाहेब पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, संपर्क प्रमुख पिंपरी चिंचवडचे नेते गणेशभाऊ भांडवलकर, पुणे संपर्क प्रमुख गणेश सरकटे पाटील, सचिन आल्हाट पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष, छावा ट्रान्सपोट मोईन शेख, संभाजी ब्रिगेडचे महेश कांबळे, संजय जाधव, ज्ञानदेव लोभे, किशोर आत्तारगेकर, श्रीकांत जोगदंड, अप्पा गुरव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते




