कार्ला– : महाराष्ट्रातील लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला गडावरील आई एकविरा देवीचा मंदिर परिसर समस्याच्या विळख्यात सापडला असून देवीच्या दर्शनासाठी येणारे भाविक व स्थानिक ग्रामस्त या सर्वांना या समस्यांचा सामना करावा लागत असताना त्या समस्या सोडविण्यासाठी शासनाकडून कोणतीही ठोस कृती होत नसल्याने या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी व तात्काळ सोडविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अशोक कुटे हे बेमुदत उपोषणाला बसले आहे.
याबाबत त्यांनी पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते खालील समस्या सोडविण्यासाठी तात्काळ संबंधित विभाग अधिकाऱ्यांची बैठक लावत निर्णय न घेतल्यास येत्या २३ नोव्हेंबर पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा कुटे यांनी दिला होता. कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय न झाल्याने दिं २३ पासून ते श्री आई एकविरा मंदिर पायथा मंदिरासमोर ते उपोषणासाठी बसले आहे.
त्यांच्या या उपोषणाला वेहरगाव,कार्ला ग्रामस्त,भाविक भक्तांनी पांठीबा दिला आहे.सर्व ग्रामस्थ कुटे यांंच्या पाठीशी असल्याचे वेहरगाव ग्रामस्थांनी सांगितले. तसेच वेहरगाव दहिवली ग्रामपंचायत पदाधिका-यांनी कुटे यांची भेट घेऊन ग्रामपंचातीच्या बद्दल काही मागण्या बाबत तातडीने बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.
काय आहेत मागण्या
1 ) कार्लाफाटा ते एकविरा देवी पायथा रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने व निकृष्ट दर्जाचे चालू असून ते उत्तम दर्जाचे व तात्काळ पुर्ण करण्याचे आदेश देण्यात यावे .
2 ) एकविरा देवी पायथा मंदिराजवळ असलेल्या वनविभागाच्या मोकळ्या जागेचे सपाटीकरण करून कायमस्वरूपी ती जागा वाहनतळासाठी वापरण्यासाठी आदेश करण्यात यावा . ( पे अँण्ड पार्क )
3 ) पायथा मंदिराच्या आसपास पाच पायरी मंदिर , गडावरील मुख्य मंदिर या ठिकाणी शौचालयांची संख्या वाढवावी व ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी .
4 ) गड परिसरातील स्वच्छतेसाठी एकविरा देवस्थान , वनविभाग , मंदिर प्रशासन व ग्रामपंचायत यांना योग्य सूचना देण्यात याव्यात.
5 ) गडाकडे जाणाऱ्या पुरातत्व विभागाच्या अख्यारित येणाऱ्या पायऱ्यांची डागडूजी करून पायऱ्यांच्या बाजूने पिण्याच्या पाण्याची , शौचालयाची तसेच , ठिकठिकाणी निवारा शेडची व्यवस्था करण्यात यावी.
6) पाच पायरी पार्किंगच्या लगत असलेल्या वनविभागाच्या जागेमध्ये वनउद्यानाची उभारणी करण्यात यावी.
7 ) पायथा मंदिरापाशी असणाऱ्या ऐतिहासिक तलावाचे बांधण्यात आलेले कठडे तुटलेले असून ते दुरूस्त करून तलावालगत असलेल्या जागेत छोटेसे बालउद्यान उभारण्यात यावे.
- सर्व दुकाने राहणार बंद
श्री एकविरा टपरी संघटनेतील सर्व दुकानदार मालक चालक यांनी चालू असलेल्या बेमुदत उपोषणाला पांठीबा देत दिनांक 24 गुरवार रोजी सर्व व्यापारी असोसिएशन (गडावरून ते पूर्ण शिवसेना शाखा दहीवली पर्यंत




