पुणे : पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे सभासद व गणेश खिंड विभागाचे विक्रेते बंधू राजेंद्र पिंगळे यांची मुलगी निकीता पिंगळे हिने सात वर्षापूर्वी कंपनी सचिव म्हणून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर पुण्यात प्रॅक्टिससाठी जॉब करत होती. तिच्या कामाचे उत्तम कामगिरी पाहून तिला इंग्लंडमधुन असिस्टंट टू व्हाईस प्रेसिडेंट जाँब ऑफर मिळाला. यामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांच्या संघाच्या वतीने तिला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
इंग्लंड येथील नामांकित एका कंपनीमध्ये तिला असिस्टंट टू व्हाईस प्रेसिडेंट या पदावर काम करणार आहे. तेथे तिला 70 लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. उद्या सोमवार 28 नोव्हेंबर रोजी इंग्लंडमध्ये कामावर रुजू होणार आहे. निकिता हिच्या उत्तुंग भरारी बद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे अशा भावना पुणे व पिंपरी चिंचवड वृत्तपत्र संघाच्या वतीने व्यक्त केल्या. तसेच तिच्या भावी आयुष्यासाठी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




