वाकड : निसर्गातून पुन्हा निसर्गाकडे हे सेंद्रिय शेतीचे मूलतत्त्व असून पर्यावरण, प्रदूषण व आरोग्य या त्रिसूत्रीचे पालन फक्त सेंद्रिय शेतीतून साधले जाऊ शकते, असे प्रतिपादन माजी खासदार व श्री संत तुकाराम साखर कारखानाचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी खासदार विदुरा नवले यांनी आज येथे केले.
ताथवडे येथे ‘इरिच इंटल इंडिया लिमिटेड’ कंपनीच्या सेंद्रिय खते उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव, माजी महापौर उषा ढोरे, कृषी तज्ज्ञ विजय ठुबे, माजी उपमहापौर झामाताई बारणे, ‘इरिच ग्रुप ऑफ कंपनीज्’चे संस्थापक-अध्यक्ष प्रदीप शेळके, ‘इरिच इंटल इंडिया लि.’ चे चेअरमन शहाजी बारणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मा. शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, मा. नगरसेवक राहुल कलाटे, मा. विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, मा. नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, मा. नगरसेविका माया बारणे, मा. नगरसेवक अभिषेक बारणे, पुष्पाताई शेळके (मुख्य संघटिका, राष्ट्रवादी महिला काँग्रेस), शामराव राक्षे, विजय ठुबे, अजित पोपट पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पुढे बोलताना नवले म्हणाले की, ‘रचनात्मक शेती करण्याकडे अलीकडच्या काळात शेतकरी नवनवीन प्रयोग व संशोधन करीत असून पिकांची वाढ व उत्पादन क्षमतेचा विकास केवळ सेंद्रिय खतांच्या माध्यमातून होतो असे म्हणाले. तर डॉ. विठ्ठलराव जाधव यांनी, ‘बदलत्या काळानुसार निसर्ग व पर्यावरण वाचवण्याची जबाबदारी सर्वांवर आली आहे. जमीन वाचवा.. जीवन वाचवा हा वाक्याच्या उक्तीप्रमाणे भविष्याचा वेध घेणारा ‘इरिच इंटल इंडिया लि.’ कंपनीने सामाजिक दायित्व स्वीकारत खत निर्मिती प्रकल्पामध्ये उतरला असल्याचे पाहून समाधान वाटते’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
‘इरिच इंटल इंडिया लि.’चे संचालक लक्ष्मण सावंत यांनी कंपनीच्या उत्पादनांची माहिती दिली. तर, संचालक संजय धनवे यांनी कंपनीचे ध्येय व उद्दिष्टे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कंपनीचे चेअरमन शहाजी बारणे यांनी केले.
प्रगतशील शेतकरी मारूती शेळके, दत्तात्रय बारणे पाटील, शिवराम भोंडवे, मुक्ताजी नाणेकर, रामचंद्र मोहिते पाटील, शाम राक्षे, मधुकर भोंडवे आदींचा सन्मान यावेळी करण्यात आला. संचालक विलास पाटील, ज्ञानेश देवडे, विशाल गावडे यांनीही उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘इरिच इंटल इंडिया लि.’ कंपनीचे संचालक विजय बोत्रे पाटील यांनी केले तर ‘इरिच ग्रुप ऑफ कंपनीज्’चे संस्थापक – अध्यक्ष प्रदीप शेळके यांनी आभार मानले.




