तळेगांव :- मावळ तालुक्यातून जाणारया मुंबई पुणे महामार्गावरील साईट पट्यांवर मागील काही दिवसांपासून हातगाड्या व टेम्पो धोकादायक पणे उभे करून विविध वस्तू व फळांची विक्री केली जात होती. यामुळे महामार्गावरून जाणारे प्रवासी अचानकपणे थांबल्याने महामार्गावर अपघात घडत होते तसेच यामुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू लागली होती. यामुळे मुंबई पुणे महामार्गालगत बाजारपेठ स्वरूप प्राप्त झाले होते. यावर आयआरबीने सोमवारी (दि.२८) सकाळी महामार्गावर वाहने उभी करून वस्तूंची विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली आहे.
मावळात जुना मुंबई पुणे महामार्गाच्या साईट पट्यांवर धोकादायक पणे हातगाड्या व टेम्पो उभे करून फळे, भाजीपाला, कपडे , शोभेच्या वस्तू , उसाचा रस आदी पदार्थांची अनधिकृत पद्धतीने विक्री केली जाते. यामुळे महामार्गावरून जाणारे प्रवासी अचानकपणे थांबल्याने महामार्गावर वारंवार किरकोळ व गंभीर स्वरूपाचे अपघात घडत होते.तसेच वाहतुक कोंडी देखील निर्माण होत होती.
रस्त्यावर वस्तूंची विक्री करणारे विक्रेते यांच्याकडे पोलीस सोयीस्कर पने दुर्लक्ष करत होते. त्यामुळे या दुकानांवर कारवाई करणार तरी कोण असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना निर्माण झाला होता. यावर पोलीसांनी कारवाई न करता आयआरबीने कारवाई केल्याने या विक्रेत्यांचे आणि पोलिसांचे आर्थिक हितसंबध असल्याने त्यांच्यावर पोलीस कारवाई करत नसल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.




