पिंपरी (प्रतिनिधी) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालयातील सापांसाठी खाय म्हणून पांढरे उदीर खरेदी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. १६३ रुपयांना एक याप्रमाणे ७ हजार २०० उंदीर खरेदी करण्यासाठी महापालिका ११ लाख ७३ हजार ६०० रुपयांचा खर्च करणार आहे.
स्थायी समितीच्या मंगळवारी (दि. २९) झालेल्या सभेत या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह अध्यक्षस्थानी होते. संभाजीनगर येथे महापालिकेचे संत निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालय आहे. पुर्वी ते सर्पोद्यान म्हणून ओळखले जात. सध्या या प्राणिसंग्रहालयाचे नुतनीकरणाचे काम सुरु आहे. सर्पौद्यानात आजमितीला विविध प्रजातींचे १८० साप आहेत. सापाचा मुख्य आहार उभयचर आणि मासे असून ते बेडूक, टेंडपोल आणि टॉइस खातात.
चांगल्या दर्जाचे उंदीर न दिल्यास पाचशे रुपये दंड
सामासाठी खाद्य पुरवठा करणान्या सॅम एंटरप्रायजेस या संस्थेने चांगल्या दर्जाच पांढरे उंदीर न दिल्यास पाचशे रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. पांढया उदरामुळे विष बाधा झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पुरवठादाराची असणार आहे.




