पिंपरी (प्रतिनिधी)- बुलेटचे मूळ सायले सर बदलणान्यांवर पोलिसानी सुरू केली. बदलेला सायलेन्सर पोलिसांनी जप्त केला. मात्र गेल्या वर्षभरापासून जप्त केलेले सायलेन्सर वाहतूक पोलीस चौकीत धूळखात पडून आहेत. तर दुसरीकडे पोलिसांची कारवाई कमी झाल्याने शहरात बुलेटचा आवाज पुन्हा वाढू लागले आहेत.
बुलेटचे मूळ सायलेन्सर बदलून त्याजागी मोठ्या आवाजाचे सायलेन्सर लावण्याची फॅशन शहरात आली होती. त्यातही काहीजण फटाक्यासारखा मोठा आवाज काढत होते. यामुळे आसपासचे वाहन चालक दचकत असे. तसेच नागरिकांनाही याचा मोठ्या प्रमाणात त्रास होऊ लागला. याची गंभीर दखल तत्कालीन पोलीस आयुक्तांनी घेतली. १८ ऑक्टोबर २०२० पासून शहरातील बुलेटचा सायलेन्सर बदलणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. सुरवातीच्या काळात पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. मात्र याचा काहीच परिणाम बुलेटस्वारांवर झाला नाही. एवढेच नव्हे तर बुलेटचे मोठ्या आवाजाचे सायलेन्सरची विक्री करणारे दुकानदार आणि ते सायलेन्सर बदलून देणारे गॅरजेच चालक यांनाही पोलिसांनी नोटीस बजावत त्यांनाही कारवाईचा इशारा दिला.
त्यानंतर बेशिस्त बुलेट चालकांवर आणखी कडक कारवाई करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. रस्त्यामध्येचच मूळ सायलेन्सर बदलणाऱ्या बुलेटचे सायलेन्सर पोलिसांनी काढून घेण्यास सुरवात केली. या मोहिमेत प्रत्येक वाहतूक पोलीस चौकीत शेकडो बुलेटचे सायलेन्सर जप्त करण्यात आले. इतर शहरांमध्ये जप्त केलेल्या बुलेट सायलेन्सरवर रोलर फिरवून नष्ट केले जातात. मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त केलेले सायलेन्सर अद्यापही वाहतूक पोलीस चौकीत धूळखात पडून आहेत.
पोलिसांनी आत्तापर्यंत तीन हजारांहून अधिक बुलेटस्वारांवर कारवाई केली आहे. मात्र तरीदेखील सायलेन्सर बदलण्याचे प्रमाण घटलेले नाही. पिंपरी चिंचवडमधील दुकानदारांनी मोठ्या आवाजाचे सायलेन्सर विक्री बंद केल्यानंतर बुलेटस्वार पुण्यात खरेदी आणि सायलेन्सर बदली करून घेण्यास आजही जात आहेत. वारंवार कारवाई करूनही मोठ्या आवाजाचे सायलेन्सर लावणे थांबत नसल्याने पोलिसांनी आणखी कारवाई तीव्र करीत बुलेटस्वारांवर ध्वनी प्रदुषण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची घोषणा केली. त्यानुसार काही गुन्हे दाखल झालेही. मात्र त्यानंतर पोलिसांनी कारवाई थंड बस्त्यात पडली आहे. आता शहरात पुन्हा बुलेटचे आवाज वाढू लागले आहेत. आता पुन्हा पोलीस आयुक्त कधी कारवाईचे आदेश देतात याकडे वाहतूक पोलीस आणि नागरिकांचे डोळे लागले आहेत.




