पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे जिल्हा व महानगर बॅडमिंटन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ८४ व्या राष्ट्रीय वरिष्ठ गट बॅडमिंटन स्पर्धा २०२३ चे आयोजन पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह येथे करण्यात आले
या कार्यक्रमात पद्मभूषण पुलेला गोपीचंद, आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, पूनावाला फौन्डेशन चे जसविंदर नारंग, बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे खजिनदार अरुण लखानी, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उप आयुक्त विठ्ठल जोशी, रविकिरण घोडके, सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांच्यासह विविध खेळाडू, प्रशिक्षक, बॅडमिंटन संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी. महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी नागरिक उपस्थित होते.
यावेळी पद्मभूषण पुलेला गोपीचंद व विविध खेळाडू, प्रशिक्षक, बॅडमिंटन संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी यांचा सत्कार करण्यात आला तसेच
पुणे जिल्हा व महानगर बॅडमिंटन असोसिएशन यांना ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा व महानगर बॅडमिंटन असोसिएशन या संघटनेच्या प्रतीकाचे अनावरण पद्मभूषण पुलेला गोपीचंद यांच्या हस्ते करण्यात आले.




