कोल्हापूर : महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावरून मागील काही दिवसापासून राजकीय वातावरण तंग झाले होते. त्यानंतर शरद पवार यांनी 48 तासात शांत झाले नाही तर मी बेळगाव मध्ये स्वतः येईन असा एल्गार पुकारला होता. त्यानंतर वातावरण हळूहळू शांत झाले. आज राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी मराठी भाषिकांची जाऊन भेट घेतली.

बेळगाव शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाला भेट देऊन उद्यानातील आपल्या मराठी अस्मितेचे मानबिंदू ,आपले आराध्यदैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आमदार रोहित पवार यांनी अभिवादन केले.
यावेळी रमाकांत कोंडुस्कर दादा व स्थानिक मराठी बांधव देखील उपस्थित होते. रमाकांत दादांनी २०२१ मध्ये बेंगळुरू मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या झालेल्या विटंबनेच्या निषेधार्थ केलेल्या आंदोलनात अनेक मराठी भाषिकांना अटक झाली होती. रमाकांत दादांना तब्बल पन्नास दिवस जेलमध्ये राहावे लागले होते. त्यांची पवार यांनी आपुलकीने चौकशी केली




