पिंपळे सौदागर : न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूलचा क्रीडा सप्ताह कै. बाळासाहेब कुंजीर क्रीडांगण पिंपळे सौदागर या ठिकाणी आयोजित केला होता. मा. नगरसेवक शत्रुघ्न काटे, मा. नगरसेविका निंर्मालाताई कुटे, ’ड’ क्षेत्रिय कार्यालय झोनल ऑफिसर उमाकांत गायकवाड, युवा महाराष्ट्र केसरी किशोर नखाते, शाळेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत, निवृत्त अभियंता शरद जाधव, प्रसिध्द लेखक धनंजय भिसे, उपाध्यक्ष कुस्तीगिर संघटना काळुराम कवितके, ऋषिकेश चोरमले महाराज, कॉन्ट्रॅक्टर व्यंकटेश जाधव, बाळासाहेब शेंडगे, मयूर ओव्हाळ, इंजिनिअर शशी जाधव, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यात कबबडी, खो-खो, क्रिकेट, रनिंग, सॅक रेस, लेमन अँड स्पून, बुक बेलन्सिंग, रस्सीखेच, स्किपींग, बॉल इन बास्केट, हॉपिंग, फ्रुट कलेक्टिंग, बॅग पॅकअप, थ्री लेग्स, फ्रॉग जम्प आणि रिंग थ्रोविंग या क्रीडाचे आयोजन करण्यात आले होते तसेच पालकांसाठी संगीतखुर्ची, रस्सीखेच, आणि क्रिकेट या स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुनंदा साळवी मॅडम यांनी केले व क्रीडाशिक्षक आशिष पांडे यांनी आभार मानले




