पिंपरी : विनीयार्ड वर्कर्स चर्च दापोडी येथे नाताळनिमित्त ख्रिस्ती बांधवांनी मेणबत्त्या पेटवून ख्रिस्त जन्माचा सण साजरा केला.

ख्रिसमस हा जगातला लोकप्रिय सण आहे. जगभरात तो वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. या दिवशी केक कापून, मित्रांना आणि नातेवाईकांना भेटवस्तू देऊन ख्रिश्चन बांधव ख्रिसमस साजरा करतात.
Jesus Christ यांचा जन्मदिवस म्हणून ख्रिस्ती बांधव 25 डिसेंबर दिवशी नाताळ अर्थात ख्रिसमसचा सण साजरा करतात. दापोडी येथील विनीयार्ड वर्कर्स चर्च मध्ये आज या दिवसाच्या निमित्ताने चर्च परिसरामध्ये पिंपरी चिंचवडकरांनी रस्त्यावर उतरून सेलिब्रेशन केले. काहींनी या सेलिब्रेशनमध्ये नाच, गाणी करत आनंदाचा दिवस साजरा करण्यास सुरूवात केली आहे




