निगडी (वार्ताहर) समाजकारण आणि राजकारणाची पातळी घसरली असलीतरी कवी हे सांस्कृतिक संचित असून त्यांच्यामुळे महाराष्ट्राची सुसंस्कृत अशी ओळख टिकून आहे, असे मत माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी व्यक्त केले.
आचार्य अत्रे रंगमंदिर, पिंपरी येथे संवेदना प्रकाशननिर्मित आणि कवी सूर्यकांत भोसले लिखित शब्दधून’ या कवितासंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप गांधलीकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले, राज अहेरराव, नितीन हिरवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीकांत चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. कवी सूर्यकांत भोसले यांनी आपली भूमिका विषद केली. प्रदीप गांधलीकर म्हणाले की, शब्दांचे सामर्थ्य अफाट आहे.
प्रकाशन सोहळ्यानंतर कवी मधुसूदन घाणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविसंमेलनात बंडा जोशी, अनिल दीक्षित, सीताराम नरके, सीमा गांधी, अनंत गोगले, आनंद गायकवाड, संकेत खांडगे, पल्लवी येवले, अरुण कांबळे, अशोक भांबुरे, राहुल भोसले, आशा शिंदे, उद्धव महाजन, रमेश पिंजरकर, राजेंद्र चौधरी, नितीन शिंदे, मकरंद घाणेकर, जगदीप वनशीव यांनी कवितांचे सादरीकरण केले. प्रा. विजय लोंढे यांनी कविसंमेलनाचे तर योगिता पाखले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.




