- वाकडमध्ये रंगणार पिंपरी-चिंचवड प्रिमियम लीगचा थरार
पिंपरी : राहुल कलाटे फाउंडेशन तर्फे पिंपरी-चिंचवड प्रिमियम लीग क्रिकेट स्पर्धेची तिसऱ्या पर्वाची सुरुवात वाकड येथील सिल्व्हर स्पोर्ट्स क्लब मैदानावर दिमाखदार सोहळ्यात सुरुवात झाली. स्पर्धेचे उद्घाटन शिरूरचे खासदार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भव्य ट्रॉफीचे अनावरण करून स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला.

स्पर्धेची सुरुवात एएस एव्हेंजर्स ए.एस आवेंजर्स व स्पिरिया स्पार्टन्स या संघातील पहिल्या सामन्यासाठी डॉ. कोल्हे यांनी नाणेफेक टाकून केली. यावेळी मा. ज्येष्ठ नगरसेवक राहुल कलाटे, माजी नगरसेवक संदीप वाघेरे, नवनाथ जगताप, हाऊसिंग फेडरेशनचे दत्तात्रय देशमुख, सुधीर देशमुख, शिवशक्ती बँकेचे चेअरमन विजय कलाटे, सागर कलाटे, स्वराज कलाटे, राजेश कांबळे, विजय चव्हाण, उदय शाब्दे, व्यंकटेश बजाज, समीर बनकर, मिनी सासणे, कलाटे फाउंडेशनचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने क्रिकेट रसिक उपस्थित होते.
हे स्पर्धेचे तिसरे वर्ष असून यावर्षी स्पर्धेत तबबल १८० संघ सहभागी झाले असून एकूण ९० साखळी सामने खेळले जातील. पहिल्या फेरीत ४५, दुसऱ्या फेरीत २२, उपाअंत्य पूर्व ११ तर उपांत्य ४ सामने खेळविले जाणार आहेत. स्पर्धेमधील पराभूत संघालाही ट्रॉफी व सन्मानप पत्राने गौरविण्यात येणार आहे. आयोजकांनी प्रत्येक खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून क्रिकेट जर्सी दिली आहे. खेळाला व खेळाडूंना प्रोत्साहन देणे ही प्रत्येक लोकनेत्याची जबाबदारी असल्याचे सांगत खा. कोल्हे यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. आयोजक चिंचवड विधानसभेतील ज्येष्ठ नगरसेवक राहुल कलाटे यांनी पिंपरी-चिंचवड क्रिकेट लीगला जिल्हा व राज्य स्तरावर उंची मिळवून देण्याचा मनोदय व्यक्त केला.
राहुलदादाच चिंचवडचे कॅप्टन!
स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी खासदार कोल्हे यांनी बॅटिंग करावी त्यांना राहुल कलाटे बॉलिंग करतील असा आग्रह समालोचकाने केला. यावर गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत कलाटे यांचे बॅट हे चिन्ह होते. त्यावर कलाटेंनी काटे की टक्कर दिली होती. हा धागा धरत कोल्हे यांनी आपल्या खास शैलीत अहो दादांच्याच हाती बॅट चांगली दिसते मी बॉलिंग करतो असे म्हणाताच एकच हशा पिकला. पुढे ते म्हणाले अष्टपैलू व्यक्तीमत्व असणारे राहुल दादाच चिंचवड विधानसभेचे आगामी कॅप्टन असतील.




