पिंपरी, दि.१९ जानेवारी :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका व यूनिट्रेक मिडिया, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथील एच ब्लॉक,प्लॉट नं.सी १८१, ऑटो क्लस्टर प्रदर्शन हॉल येथे घनकचरा व्यवस्थापन विषयक मोफत प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
घरातील निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रीया कशी करायची तसेच सांडपाण्याचे पुनर्वापर करण्याचे तंत्र याबाबत या प्रदर्शनात माहिती दिली जाणार असून कचऱ्यापासून खत निर्मितीची प्रक्रीया याबाबत प्रदर्शनात माहिती दिली जाणार आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका व यूनिट्रेक मिडिया मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने घनकचरा व्यवस्थापन, सांडपाण्याचे पुनर्वापराचे तंत्र, कचऱ्यापासून खत निर्मिती अशा उपयुक्त व माहितीपूर्ण प्रदर्शनाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. प्रदर्शन दि.२० ते २२ जानेवारी या कालावधीत सकाळी ११ ते ७ वाजेपर्यंत असणार आहे.




