लोणावळा : लोणावळा शहरातील सहारा पुल भागात फिरायला गेलेल्या दोघांना चाकूचा धाक दाखवत लुटल्याची घटना रविवारी 22 जानेवारी रोजी रात्री 8.30 च्या सुमारास घडली. तर दुसऱ्या घटनेत टेबल लॅन्ड परिसरात रेल्वे ट्रॅक जवळ लोणावळ्यातील एका युवकावर अनोळखी व्यक्तीने चाकू हल्ला केल्यासंदर्भातील गुन्हा लोणावळा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या घटनेत सलमान उस्मान खान (वय 19, रा. टेबल चाळ, जी वार्ड, लोणावळा) याने फिर्याद दिली आहे. सलमान व त्याची मैत्रिण हे रविवारी रात्री लोणावळा ब्रिजच्या पुढे फिरायला गेले असताना त्याठिकाणी असलेल्या तीन अनोळखी व्यक्तीनी त्यांना चाकूचा धाक दाखवला. तसेच सलमान याच्या हातावर चाकूने वार करुन गंभिर जखमी करत त्याच्या जवळील आय फोन, त्याच्या मैत्रिणीकडील सोन्याची दोन तोळ्याची चैन व चांदीची अंगटी असा 1 लाख 12 हजार 400 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेत लुटला.
सलमान याने दिलेल्या फिर्यादीवरून सदर प्रकरणी लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक सुरेखा शिंदे तपास करत आहेत.
तर दुसऱ्या घटनेत ‘तुम्ही या रस्त्याने पुढे जायचे नाही’ असे म्हणत टेबल लॅन्ड येथे रेल्वे ट्रॅक जवळ लोणावळ्यातील एका युवकावर चाकू हल्ला झाल्याची घटना शुक्रवारी 20 जानेवारी रोजी रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी अमित सलेंदर चौरसिया (वय 28, रा. पांगोळी, लोणावळा. मूळ रा. खलीलाबाद, उत्तर प्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे.
शुक्रवारी अमिय चौरसिया हे टेबल लँन्ड जवळून जात असताना एका 25 ते 30 वयोगटातील अनोळखी युवकाने काही एक कारण नसताना तुम्ही या रस्त्याने जायचे नाही असे बोलून फिर्यादी समोर येऊन त्याच्या हातातील चाकू सारखे हत्याराने फिर्यादीचे पोटात मारून गंभीर जखमी केले. काल 22 जानेवारी रोजी रविवारी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार म्हेत्रे घटनेचा तपास कuरत आहेत.




