पिंपळे सौदागर : न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात पार पडली. यावेळी रेल्वे पोलीस निरीक्षक श्री प्रमोद खोपीकर संस्थेचे संस्थापक श्री अरुण चाबुकस्वार, सेक्रेटरी संदीप चाबुकस्वार, बार्टीच्या संगीता शहाडे व प्रशांत कुलकर्णी साहेब तसेच पालक सौ प्रिया हिबारे व अवधूत कारवाल, शाळेचे उप-मुख्याध्यापक श्री सचिन कळसाईत उपस्थित होते.
श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याची तसेच शिवरायांची लोककल्याणकारी अर्थव्यवस्था, सामान्याचे सक्षमीकरण याविषयी रेल्वे रेल्वे पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
इयत्ता पाचवीच्या व सातवीच्या विद्यार्थ्यांनी पोवाड्यांचे सादरीकरण केले ,शिवगीत इयत्ता पाचवी व सातवीच्या मुलींनी गायले , शिवगर्जना रिया परमार, समृद्धी जगताप आणि अर्पिता तिवारी यांनी सादरीकरण केले. तसेच राजमुद्रा प्रिया वाघमारे यांनी सादर केले राहुल चौधरी व श्रावणी सोळुंखे या मुलांनी मराठी व हिंदीत भाषण दिले, तसेच शिक्षका निशा पवार मॅडम व दिपाली पाटील मॅडम यांनी श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी भाषण केले सूत्रसंचालन प्रीती चौधरी व आभार सुमन विश्वकर्मा यांनी मानले.




