वाकड: महापालिकेतील पाच वर्षातील भाजपा सत्ता काळातील भ्रष्टाचारावर राष्ट्रवादीने कितीवेळा आवाज उठविला, कोणते प्रकरण तडीस लावले. एक-दोन ठेके मिळवून भाजपच्या भ्रष्टाचाराला साथ देण्याचे कामच स्वत:च्या पक्षाच्या नगरसेवकांनी केले. आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपच्या भ्रष्टाचाराविरोधात बोलण्याचे टाळतात. महापालिकेतील भ्रष्टाचारावर बोलत नाहीत. त्याचे गुपित जनतेला माहिती आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोनही पक्षांचा कारभार बघितला आहे. हे दोनही पक्ष एकाच्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे चिंचवडची जनता पोटनिवडणुकीत या दोनही पक्षाला त्यांची जागा दाखवेल. मला नक्कीच साथ देईल आणि विधानसभेत पाठवेल, असा विश्वास अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी आणि भाजप हे दोनही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजु असल्याचे चिंचवडच्या जनतेच्या लक्षात आले आहे. त्यामुळे आता पोटनिवडणुकीत चिंचवडची जनता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोनही पक्षाला त्यांची जागा दाखवेल. मी चिंचवडकरांच्या स्वाभिमानीसाठी पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचेही ते म्हणाले.




