पिंपरी : चिंचवड विधानसभा पोट निवडणूक दिवसेंदिवस चुरशीची वाढत चालली आहे. निवडणुकीचा अंतिम टप्प्यात आली असताना वंचित बहुजन विकास आघाडीमध्ये दुहेरी फूट पडल्याचे दिसून आले. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा दर्शविला. मात्र, आंबेडकर यांच्या पिंपरी चिंचवड शहरातील जाहीर सभेपूर्वी दिवशी वंचित बहुजन आघाडीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी संपूर्ण कार्यकारणी सदस्य थेट शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
चिंचवड निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपमध्ये थेट लढत होत आहे यामध्ये महाविकास आघाडीची मतदान अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यामुळे कमी होणार आहे अशावेळी राहुल कलाटे यांना उद्धव ठाकरे यांच्याशी मैत्रीचा हात देणारे वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दिल्यामुळे चिंचवड विधानसभेत मतदानात विभागणी होईल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र अध्यक्ष अपक्ष उमेदवार सोबत आणि शहरातील सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादीसोबत गेल्याचे चित्र पहावयास दिसून आले. त्यामुळे चिंचवड विधानसभेत वंचित आघाडीचे मतदान राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यात पाडण्यात राष्ट्रवादीला यश आल्याचे चित्र दिसून येत आहे.
याबरोबर रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे यामुळे ओबीसी समाजातील मतदान राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यात पडल्याचे चित्र दिसून येत आहे.




