पिंपरी : निराधारनगर पिंपरी येथे श्रीमती परेगाबाई अशोक शिंदे (वय ५८ वर्षे) ही महिला आणि मुलगा विश्वास अशोक शिंदे (वय ३० वर्षे) याचेसह राहत होती. तिन्ही मुलींची लग्ने झाली असुन मुलगा विश्वास कच-याच्या घंटागाडीवर लेबर म्हणुन कामास जातो. विश्वास हा सन २०१५ पासुन खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयात चार वर्षे येरवडा जेलमध्ये होता. जेलमधुन सुटल्यानंतर विश्वास हा दारुचा व्यसनी झाला विनाकारण तो त्याची आई परेगाचाई हिचेशी भांडणतंटा करीत होता. परेगाबाई ही कचरा गोळा करण्याचे काम करुन तिचे कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत होती.
दिनांक ९ / ३ / २०२३ रोजी सकाळी ८.०० वा. चे सुमारास दारु नशेत झोपलेला परेगाबाई हिचा मुलगा विश्वास यास उठवण्याचा प्रयत्न केला व कामावर का जात नाही अशी विचारणा केली असता गुन्हेगारी पार्श्वभुमीच्या रागीट विश्वासला त्याचा भयंकर राग आला त्याने झोपेतून उठत कोणताही विचार न करता आई पगाबाई हिला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने रस्तावर पडलेला सिमेंटचा ब्लॉक (गट्टू) उचलुन तिचे डोक्यात मारला त्यामुळे ती रक्तबंबाळ होवून कशीबशी धडपडत जिव वाचविण्यासाठी गल्लीतून पळत सुटली. विश्वास हा तिला पुन्हा मारणेसाठी तिचे मागे लागला. पळतांना परेगाबाई पायात पाय अडकुन पडली त्यावेळी तिचा आरडा ओरडा ऐकून गल्लीतील लोक जमा झाले त्यांनी तिला उचलले, पाणी पाजुन घरी नेले. लोक जमा झाल्याचे पाहून विश्वास हा दारु पिणेसाठी तेथुन निघुन गेला. शेजारच्या लोकांना परेगाबाई व तिचा मुलगा विश्वास यांचे भांडण झाले हे माहीती होते. परंतू ती पाय घसरून पडली त्यामुळेच गंभीर जखमी झाली असा समज झाला होता. लोकांनी तिच्या मुलीला फोन करुन बोलावुन घेतले. मुलीने तळेगाव येथील हॉस्पीटलला घेवून जावुन अॅडमीट केले. डोक्यावर गंभीर मार लागुन आतील बाजूस रक्तस्त्राव झाल्यामुळे रक्त साकळल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उपचार चालू असतांना परेगाबाई ही कोमामध्ये गेली व त्यातच ती मयत झाली.
गुन्हे शाखा युनिट २ चे सहा. पोलीस फौजदार शिवानंद स्वामी यांना त्यांचा अत्यंत विश्वासू व गोपनिय बातमीदार याने मयत परेगाबाई हिचा तिचा मुलगा विश्वास याने डोक्यात सिमेंटचा गट्टू मारुन खुन केल्याचे खात्रीशीर सांगितलेने पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांचे मार्गदर्शनाखाली सपोफी स्वामी, दिलीप चौधरी, आतिश कुडके, अजित सानप, शिवाजी मुंढे, उध्दव खेडकर यांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने सखोल तपास करुन बातमीची विश्वासाहर्ता तपासुन विश्वास अशोक शिंदे हा आई मयत झाल्याचे समजताच पळुन जाण्याच्या तयारीत असतांना त्याला सापळा लावुन शिताफीने पकडले. त्याचेकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिल्याने खुनाच्या गुन्हयाचा उलगडा करण्यात यश आले.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त श्री मनोज लोहीया, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. श्री संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त गुन्हे श्रीमती स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. प्रशांत अमृतकर, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उप निरीक्षक गणेश माने गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस अंमलदार शिवानंद स्वामी, दिलीप चौधरी, आतिश कुडके, अजित सानप, शिवाजी मुंढे, उध्दव खेडकर यांनी केली आहे.




