हिंजवडी : हिंजवडीतील बगाड ही मधोमध तुटलं अन बगाडचे यंदाचे गळकरी खाली कोसळले. सुदैवाने यात त्यांना कोणतीही गंभीर इजा झाली नाही. हिंजवडी गावातील म्हातोबा देवाची आज यात्रा होती. अनेक वर्षांच्या परंपरेनुसार या यात्रेत बगाडाची प्रथा आहे. यंदा श्रीधर जांभुळकर यांना गळकरीचा मान होता. सायंकाळी बगाड सुरू झालं, हेलिकॉप्टर ने पुष्पवृष्टी सुरू झाली. तेंव्हाच हे बगाड मधोमध तुटलं. सुदैवाने यात त्यांना कोणतीही गंभीर इजा झाली नाही.

बगाडवरती हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली
काल पुण्यातील जुन्नर तालुक्यात ही अशीच घटना घडली. पारुंडे गावातील यात्रेतील बगाडाची प्रदक्षिणा सुरू असतानाच ते मधोमध तुटलं अन दोन मानकरी जखमी झाले होते. : आयटी सीटी अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी भागात दरवर्षीप्रमाणे मोठे उत्साहात बगाड उत्सव आयोजित करण्यात येतो.
मात्र यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या बगाड उत्सवामध्ये बगाडाचा शेला अचानक तुटल्याने भाविकांची मोठी हिरमोड झाली. हिंजवडी भागात ग्रामदैवत म्हातोबाच्या यात्रेनिमित्त दरवर्षी बगाड उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यावर्षी देखिल आयोजित करण्यात आलेल्या बगाड उत्सवाच्या जत्रेत मानाच्या बगाडावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. मात्र बगाडावर मानकरी चढवण्याआधीच शेला तुटला आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेमध्ये कोणीही जखमी झाला नाही. मात्र बगडाचा शेला एवढ्या वर्षात प्रथमच तुटल्याने पंचक्रोशीतील भाविकांमध्ये नाराजी बघायला मिळाली”




