पिंपरी (प्रतिनिधी)- प्रवाशांच्या सोयीसाठी मागणीवरून पीएमपीएमएल कडून बसमार्ग क्रमांक स्टॅण्ड ते हिंजवडी माण फेज ३, बसमार्ग क्रमांक ३१० सिम्बायोसिस हॉस्पिटल, लवळे या दोन मार्गांवर (शुक्रवार २८) गर्दीच्या वेळेत नव्याने बससेवा सुरू करण्यात येइल अशी माहिती पीएमपीतर्फे देण्यात आली आहे.
कोथरूड आणि हिंजवडी परिसरात ये-जा करण्यासाठी अनेकदा बस बदलत जावे लागत होते. त्यामुळे ही बस सुरू करण्यात आल्याने प्रवाशांची सोय होणार आहे. त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन पीएमपी प्रशासनाने केले आहे. बस कोथरूड स्टॅण्ड ते हिंजवडी माण फेज ३ आणि बस चांदणी चौक, वाकड ब्रिज, बाणेर मार्गे धावणार आहे. क्रमांक ३१० सांगवी गाव ते सिम्बायोसिस हॉस्पिटल ही पिंपळेगुरव, वाकड, बालेवाडी, सुसगाव, पिंपरी या मार्गावर धावणार आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणारे प्रवासी, नागरिक, नोकरदार, महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक आदींनी लाभ मिळणार आहे.




