पिंपरी : आरोग्य भारती मेडीकल स्टोअर्स फ्राचलाईजमध्ये १० लाख रुपये व आरोग्यवत मेडीकेअर प्रा. ली. कंपनीमध्ये २० टक्के भागीदारी म्हणुन ३० लाख असे एकुण ४० लाख आरटीजेसद्वारे स्विकारुन फिर्यादीला आरोपीने गुंतवणुक करण्याचे आमिष दाखवले.
फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन व्यवसायाच्या खोट्या जाहीराती बनवुन एकत्रीत रक्कम रुपये ४० लाख स्वीकारून कोणतेही कागदपत्रे न देता फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली. हा प्रकार (दि २७/०९/२०२१ ते दि १८/०१/२०२२) पर्यत कोरेगाव पार्क, पुणे येथे घडला.
फिर्यादी वसंत पांडुरंग सांबळे (सेवानिवृत, परांडेनगर, दिघी) यांनी आरोपी गौतम शिवाजी मोरे (वय ३९ वर्ष कल्याण पश्चिम, जि. ठाणे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. दिघी पोलिसांनी २०५/२०२३ भा. द.वी. कलम ४२० नुसार आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे




