वडगाव मावळ दि.15 : येथील श्री.संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यापक महाविद्यालयातील डॉ. संदीप गाडेकर यांची प्रशासन व मूल्यमापन विषयाच्या अभ्यास मंडळावर नुकतीच नेमणूक झाली आहे. त्यांंच्या निवडीबद्दल अनेक मान्यवरांनी त्यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले.
डॉ. संदीप गाडेकर यांनी 20 शोध निबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये प्रसिद्ध केले आहे. एकूण 4 विद्यार्थ्यांना पीएच.डी चे मार्गदर्शन सुरू आहे. तसेच 40 राज्यस्तरीय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधन पर शोध निबंध सादर केलेले आहे. आत्तापर्यंत एकूण 12 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्याच्या निवडीबद्दल संस्थेचे सचिव अशोक बाफना , अध्यक्ष तुकाराम असवले व सर्व संचालक मंडळ व प्रभारी प्राचार्य डॉ. अनिता धायगुडे यांनी अभिनंदन केले. पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. नवीन शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीच्या दरम्यान ही निवड झाल्याने त्यांना अधिक भरीव कामगिरी करण्याची संधी प्राप्त झाली आहे.




