पिंपरी : चिखली पोलिसानी सराईत चोरास बेड्या ठोकल्या आहेत. शिवाय, दोन मोटर सायकल चोरीचे व दोन लॅपटॉप चोरीचे असे एकूण ४ गुन्हे उघड केले आहेत.
चिखली सह शहरात मागील तीन ते चार महिन्यांपासून मोठया प्रमाणात वाहने चोरीला जात आहेत. त्यामुळे अश्या मोटार सायकल चोरीला प्रतिबंध व्हावा यासाठी उपाय म्हणून वरिष्ठांच्या निर्देशनानुसार चिखली पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी वाहन चोरी विरोधी पथक तयार करुन त्याअनुषंगाने पोलिस ठाणेच्या हददीमध्ये नियमीत पेट्रोलींग करण्यास व बातमीदार नेमूण वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली.
त्यानुसार आज (शनिवार) वाहन चोरी विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी राकेश गुमाने, सहा.पोलिस निरीक्षक तसेच पोलिस अमलदार पोहवा. ११३३ / साकोरे, पोना. १५४६/ गायकवाड, पोना. १८५६/पिंजारी, असे मोटर सायकल चोरीस प्रतिबंध होण्याच्या अनुषंगाने चिखली पोलिस ठाणेच्या हददीमध्ये पेट्रोलींग करत होते.
नेवाळेवस्ती व हरगुडेवस्ती दरम्यान एक संशयीत मोटार सायकलवरुन येत असल्याचे दिसून आले. त्यास त्यांनी थांबवून त्याच्याकडील मोटार सायकल बाबत खात्री करता त्याचेकडे मोटार चालविण्याचा परवाना व मोटार सायकल मालकी संदर्भात कोणतेही कागदपत्र उपलब्ध नव्हती, तसेच त्याचेकडे वाहनाबाबत खात्री करता उडवाउडवीची उत्तरे दिली. सदरच्या व्यक्तीची हालचाल संशयास्पद दिसून आल्याने त्यांनी त्याचेकडे असलेली सॅक पाहता त्यामध्ये दोन लॅपटॉप दिसून आले. लॅपटॉप बाबत देखील त्याच्याकडे माहिती विचारता तो कोणतेही समाधानकारक उत्तरे दिली नाही. टिकम बिवाराम चंद (वय – २५ वर्ष रा. सोळंकी डिस्ट्रीब्युटस्,सी/३९/४०, कुणाल प्लाझा, चिंचवड रेल्वे स्टेशन रोड, चिंचवड मुळ रा.मु. पो. शेहवाज ता.मारवाड जंक्शन जि. पाली, राजस्थान) असे त्याचे नाव आहे.
टिकम बिवाराम चंद याच्या ताब्यातील मोटर सायकल व लॅपटॉपसह चिखली पोलिस ठाणे येथे आणून त्याच्याकडे हिरो स्पेल्डर मोटार सायकल नंबर एम.एच.१४ ईई १४१६ व लॅपटॉपबाबत राकेश गुमाने यांनी विश्वासामध्ये घेवून चौकशी केली असता त्याने १९.०५.२०२३ रोजी सकाळी ०७.०० वाजण्याचे सुमारास नेवाळेवस्ती येथून मोटार सायकल चोरलेली असल्याचे सांगितलेले आहे. तसेच लॅपटॉपबाबत चौकशी करता त्याने पुर्णानगर व जाधववाडी येथे कारची काच फोडुन त्यामधील लॅपटॉप व मोटार सायकलचे हॅन्डलला लावलेला लॅपटॉप चोरी केलेला असल्याचे सांगितले आहे. सदर चोरीबाबत चिखली पोलिस ठाणेकडील अभिलेखाची पाहणी करता मोटार सायकल चोरीबाबत चिखली पोलिस ठाणे गु.र.नं.३३६ / २०२३ भादविक ३७९ व लॅपटॉप चोरीबाबत चिखली पोलिस ठाणे गु.र.नं.३३८ / २०२३ भादविक ३७९, ४२७ व गु.र.नं.३३९/२०२३ भादविक ३७९ प्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे दिसून आले आहे. आरोपी याचे ताब्यातून
१) २०,००० रुपये किंमतीची एक हिरो स्पेल्डर मोटार सायकल नंबर एम.एच.१४ ईई १४१६,
२) ३०,००० रुपये किंमतीचा एक एच. पी. प्रो बुक – ४४० जी-४ कंपनीचा सिल्वर रंगाचा लॅपटॉप,
३) ४०,००० रुपये किंमतीचा एक डेल कंपनीचा काळया रंगाचा लॅपटॉप,
४) ५०० रुपये किंमतीची एक काळया रंगाची लॅपटॉप बॅग असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
त्यानंतर सदर आरोपीस चिखली पोलिस ठाणे गुन्हा रजि नंबर ३३६ / २०२३ भादवि कलम ३७९ मध्ये अटक करुन त्याचेकडे पोलिस कस्टडीत असतांना तपास केला असता त्याने गेले ४ दिवसापुर्वी रामनगर, चिंचवड, पुणे येथून एक हिरो स्पेल्डर मो.सा. नंबर एम.एच.२२.के.४२७४ ही चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने ती मोटर सायकल जप्त केली आहे. सदर बाबत पिंपरी पोलिस ठाणेत गुन्हा दाखल असल्याची नोंद आहे.
सदरची कारवाई देहूरोड विभागाचे सहा. पोलिस आयुक्त पदमाकर घनवट, चिखली पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र बर्गे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली वाहन चोरी विरोधी पथकाचे अधिकारी सहा. पोलिस निरीक्षक, श्री. राकेश गुमाने, पोहवा /११३३ साकोरे, पोहवा/५७२ पांढरे, पोहवा / ९६४ नागरे, पोना / ९६२ राठोड, पोना. १५४६/गायकवाड, पोना/१८१३ सुतार, पोना.१८५६/पिंजारी, या पथकाने केली आहे. आरोपीकडून एकूण ४ गुन्हे उघडकीस आणले असून, पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.




