पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा हा आज (दि. 11 जून) श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातून पंढरपूरकडे प्रस्थान होणार असते. या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भावी अलंकापुरी नगरीत दाखल होतात व दुसऱ्या दिवशी लाखोंच्या संख्येने हरिनामाचा गजर करीत सोहळा पंढरीकडे मार्गस्थ होतो. यंदा या सोहळ्यात भाविकांची संख्या ही लक्षणीय असणार असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
मंदिर व्यवस्थापनाने यावर्षी केवळ 75 दिंड्यांना मंदिरामध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वादाचा प्रसंग निर्माण झाला. टाळ भिरकावत वारकऱ्याने पोलिसांना प्रतिकार केल्याने पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे. त्यासोबतच पोलिसांनी वारकऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज केल्यामुळे वारकऱ्यांकडून नाराजीचा सूर आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने याबद्दल माहिती दिली आहे.
दरम्यान, प्रस्थान चार वाजता असल्याने भाविकांनी दुपारी बारा वाजल्यापासूनच गर्दी केली होती. दरम्यान, प्रस्थान चार वाजता असल्याने भाविकांनी दुपारी बारा वाजल्यापासूनच मंदिर परिसरात गर्दी केली. सध्याच्या उन्हाची तीव्रता टाळण्यासाठी प्रस्थान सोहळा मर्यादित वेळेत करण्याचा संस्थानचा मानस आहे, असे पालखी सोहळाप्रमुख अॅड. विकास ढगे, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी सांगितले. यावेळी काही काळ पोलिस आणि वारकऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं दिसून येत आहे.
पालखी सोहळा दि. 12 जून रोजी आळंदीहून पुणे मुक्कामी राहील. दि. 14 रोजी सासवडकडे प्रस्थान ठेवेल. दि. 15 रोजी पालखीचा मुक्काम सासवड येथेच राहिल. दरम्यान, या प्रस्थानापूर्वी आळंदीत पोलिस आणि वारकऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला असल्याचं दिसून आले आहे.




