आळंदी दि. 25(वार्ताहर): खेड तालुक्याचे आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी देवाची येथील फुटवाले धर्मशाळा येथे उद्या मंगळवार (दि.27 जून) रोजी शासन आपल्या दारी अभिनयाच आयोजन करण्यात आले आहे. आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी महाराष्ट्र शासनाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ तसेच आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा बाबत अडचणी असतील तर ते सोडवण्यासाठी आणि नागरिकांना विविध शासकीय कामाबाबत अडचणी येतात त्या सोडवण्यासाठी सदर शासन आपल्या दारी अभियानाचे आयोजन केले आहे.
अभियानामध्ये रेशन कार्ड मतदार यादीतील दुरुस्ती, निराधार योजना.मुख्यमंत्री सहायता निधी आरोग्य विमा. शिधापुरवठातील त्रुटी. घरगुती गॅस बाबत अडचणी नवीन शिधापत्रिका आणि इतर शासकीय कामे ज्यामुळे नागरिक त्रस्त होतात त्याचा जागेवर निपटारा होऊन निर्णय घेणे साठी सर्व विभागातील शासकीय अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते आरीफ भाई शेख यांनी दिली आहे. आळंदी आणि पंचक्रोशीतील विवीध स्वरूपाच्या शासकिय कामातील अडचणीचा निपटारा या ठिकाणी होईल.
तसेच शासकीय मदतीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी सर्व नागरिकांनी फ्रूटवाले धर्मशाळा येथे मंगळवार दि. 27 जून रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये येऊन आपली प्रलंबित असलेली कामे त्वरित मार्गी लावण्यासाठी होणाऱ्या या आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शासन आपल्या दारी अभियानाचा लाभ घ्यावा असे आवाहन खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता आरीफभाई शेख यांनी केलेले आहे.




