मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे. रविवारी अजित पवार यांच्यासोबत ९ जणांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे. यासोबतच ३० आमदार अजित पवार यांच्या सोबत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली, असे असताना डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या एका ट्विटची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है … पर दिल कभी नहीं।#मी_साहेबांसोबत @NCPspeaks @PawarSpeaks @Jayant_R_Patil @supriya_sule @Awhadspeaks @TV9Marathi @SakalMediaNews @abpmajhatv @mataonline @SaamanaOnline @SarkarnamaNews @thodkyaat… pic.twitter.com/2kAhkkfnjd
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) July 3, 2023
शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे रविवारी राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. आता कोल्हे यांनी युटर्न घेत अजित पवारांनाच मोठा धक्का दिला आहे. त्यांनी मी पवार साहेबांसोबतच म्हणत ट्विट केलं आहे.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी एक व्हिडीओ शेअर करत ‘जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है… पर दिल कभी नहीं। मी साहेबांसोबत’ अशा आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर डॉ. कोल्हे यांचं ट्विट चांगलेच चर्चेत आहे.




